Ajit Pawar Jalna Election : बंडखोरांसह मतदारांनाही तंबी, अजितदादा पोलिसांवरही संतापले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अजित पवार राज्यभर दौरा करत आहेत. आपल्या पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत, यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत.
Ajit Pawar Jalna Election : बंडखोरांसह मतदारांनाही तंबी, अजितदादा पोलिसांवरही संतापले

जालना: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सलग दोन सभांतील आक्रमक भूमिका आणि संतापपूर्ण वक्तव्यांमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रथम माळेगावातील सभेत कार्यकर्ते आणि मतदारांना कठोर इशारा दिल्यानंतर आता परतूर येथील सभेत त्यांनी थेट पोलिसांवरच राग काढल्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

अजित पवार यांनी बारामतीतील माळेगाव नगरपंचायतीच्या सभेतून प्रचाराची सुरुवात केली. या सभेत त्यांनी बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना आणि मतदारांनाही थेट इशारा देत म्हटले होते, “मी साधूसंत नाही. तुम्ही मला मतदान केलं तरच मी तुमचं काम करणार. तुम्ही काट मारला, तर मीही काट मारणार.” या विधानामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

हेही वाचा: Byjus Bankruptcy Case: बायजूसच्या मालकाला मोठा धक्का! 'या' कारणामुळे अमेरिकन न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड

अजित पवारांची ही पहिली सभा अजूनही चर्चेत असतानाच, जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषद सभेत ते पुन्हा एकदा संतापले. सभेला सुरुवात होण्यापूर्वीच स्टेजसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी थेट पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले.

व्यासपीठावरून उठून माईक हातात घेत अजित पवार म्हणाले, “माझ्या उमेदवारांना पुढे बसवा. स्टेजसमोर खुर्च्या लावा. काढा त्या खुर्च्या… लावा इथं. कळत नाहीये का?” त्यांचा हा संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अजित पवार राज्यभर दौरा करत आहेत.

आपल्या पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत, यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. परंतु सलग दोन सभांतील त्यांची आक्रमक भाषा आणि सार्वजनिक संतापामुळे ते राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बारामतीतील इशारा आणि जालन्यातील पोलिसांना सुनावणी या दोन्ही घटनांमुळे अजित पवारांच्या प्रचारशैलीवर आता विविध राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा: Nana Patole: मुख्यमंत्र्यांच्या मामेबंधूंच्या बिनविरोध विजयानंतर राजकारण तापले; नाना पटोले यांचा हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version