Ajit Pawar: भाजप-शिंदेंची दिलजमाई, पण राष्ट्रवादीसमोर पेच; मुंबई-पुण्यात अजितदादांची वेगळी चूल?

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असून, काही ठिकाणी शरद पवार गटाशी स्थानिक युतीची शक्यता वर्तवली जात आहे.
Ajit Pawar: भाजप-शिंदेंची दिलजमाई, पण राष्ट्रवादीसमोर पेच; मुंबई-पुण्यात अजितदादांची वेगळी चूल?

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक ठिकाणी जागावाटपाची समीकरणे जुळली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समोर मात्र पेच निर्माण झाला आहे.

 मुंबईत नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच आणि पुण्यात भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे आता 'दादांची राष्ट्रवादी' राज्यातील अनेक महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे एक तास महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी महायुतीमधील जागावाटपाची चाचपणी यावेळी करण्यात आली. ज्या ठिकाणी युती शक्य नाही, तिथे राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याची नुकतीच गच्छंती झाल्याने महायुतीतील इतर घटक पक्ष सध्या सावध पावले टाकत असून त्याचा परिणाम जागावाटपावर होताना दिसत आहे.

हेही वाचा: Cyclonic Wind Situation: कडाक्याची थंडी आणि दाट धुके; उत्तर भारतात रेड अलर्ट, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात गारठा वाढणार

सर्वात महत्त्वाची घडामोड पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावती महापालिकेत पाहायला मिळत आहे. या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेतही हीच परिस्थिती असून, भाजप आणि शिंदे सेनेसोबत जुळवून घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. या निर्णयाची अधिकृत घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात सर्वात मोठी चर्चा ही 'दोन्ही राष्ट्रवादी' एकत्र येणार का, याची आहे. जिथे भाजप-शिवसेनेसोबत युती होणार नाही, तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचे संकेत अजित पवार यांच्या गटाने दिले आहेत. तसे झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काका-पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसू शकते. या सर्व समीकरणांचा अंतिम फैसला 23 किंवा 24 डिसेंबर रोजी, म्हणजेच नगर परिषद निकालानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana: नमो शेतकरी योजनेत मोठा बदल; 8 वा हप्ता कधी जमा होणार?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version