Anil Deshmukh: प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांना अश्रू अनावर, हात जोडत माध्यमांसमोर भावना व्यक्त केल्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना भावनाविवश झाले असून, त्यांनी हात जोडत प्रतिक्रिया देणे टाळले.
Anil Deshmukh: प्रसार माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख  यांना अश्रू अनावर, हात जोडत माध्यमांसमोर भावना व्यक्त केल्या

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून, सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हात जोडून माध्यमांसमोर नम्रपणे प्रतिक्रिया देणे टाळले. अनिल देशमुख यांना खूप काही बोलायचे होते, मात्र भावना दाटून आल्याने ते बोलू शकले नाहीत.

अजित पवार यांच्या जाण्याने आपली वैयक्तिक आणि राजकीय मोठी हानी झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. अजित पवार यांच्याशी अनिल देशमुख यांची दीर्घकाळची चांगली राजकीय आणि वैयक्तिक नाळ होती. या नात्यामुळेच माध्यमांसमोर अनिल देशमुख अक्षरशः हात जोडून रडताना दिसले. काही क्षण ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते.

हेही वाचा: Sanjay Raut On Ajit Pawar Death : ‘कार्यकर्त्यांना नेहमीच हवेहवेसे वाटणारे नेते …’ राऊतांची अजित पवारांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, कार्यकर्ते आणि नागरिक शोकाकुल झाले आहेत. राज्यभरात शोकभावना व्यक्त केली जात असून, विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना ठरली असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा ठसा राज्याच्या राजकारणावर कायम राहील, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते कोणत्या कंपनीचे? याआधीही झाला होता अपघात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version