Ajit Pawar On BJP : ‘आम्ही कधी महापालिकेची तिजोरी खाली केली नाही’; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर सडकून टीका

Ajit Pawar On BJP : ‘आम्ही कधी महापालिकेची तिजोरी खाली केली नाही’; अजित पवारांची भाजपच्या कामकाजावर सडकून टीका

पिंपरी चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच युती, बंडखोरी, मनधरणी, मनमुटाव अशी परिस्थिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्येदेखील सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महायुतीतील घटक असलेल्या अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपनं महापालिकांची भ्रष्ट्राचार करून तिजोरी खाली केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले. अजित पवारांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीत खिंडार पडणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तृळात होत आहे. अजित पवार म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिकेची ओळख होती. बेस्ट सिटी ऑफ इंडिया म्हणून त्या काळी पुरस्कारदेखील मिळाला. अशा अनेक गोष्टी केल्या. परंतु या श्रीमंत महानगरपालिकेला कर्जात टाकले नाही. गेल्या काही वर्षात ठेवी कमीकमी होत गेल्या. आता जवळपास आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या. पण त्यानुसार कामतरी दाखवा.

हेही वाचा : Balasaheb Sarvade Death : सोलापूर हादरलं; भाजपच्या दोन गटांतील वादात मध्यस्थी करायला गेलेल्या मनसे नेत्याला संपवलं

राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, राज्यातील निवडणुका आता स्पष्ट झाल्या आहेत. महायुतीची अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकांना उशीर झाला आहे. या २०२२ ला व्हायला हव्या होत्या. पुढे पवार यांनी नमूद केले की,  या शहरांनी मला मोठं केलं. मला खासदार केलं, त्यावेळी मला काँग्रेसने मदत केली. मी विचार केला की, आपल्याला नवखा असताना इतका विश्वास ठेवला तर आता काम केले पाहिजे. त्यामुळे तेव्हापासून या शहराच्या जडणघडणीवर काम करत आलो आहे. २०१७ पर्यंत शहरात मोठे काम केले. पण २०१७ ला देशात मोदींची लाट होती. त्यात माझे अनेक सहकारी ज्यांना मी पद दिली ते निघून गेले.

भ्रष्टाचारावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

बनवलेले रस्ते उखडतात आणि परत करतात. अर्बन सिटीच्या नावाखाली कामं काढली जातात. फुटपाथवर बऱ्याच जणांनी अतिक्रमण केले आहे. अनेक जणांनी हफ्तेखोरी सुरू केली आहे. आमच्या कार्यकाळात कधीही ट्रॅफिक तुंबलं नाही. परवा मी दोन ठिकाणी सभा घेतल्या. दोन्ही ठिकाणी मी म्हणालो, इथे टेंडरमध्ये रिंग केली जाते. टेंडरमध्ये फुगवटा केला जातो. मी पुरावा दाखवतो, जे रस्ते झाले. दुसरीकडे कमी पैशांत रस्ते होतात, मी कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही. अनेक ठिकाणी २०-२० टाक्यांनी फरक असतो. अनेकनाची करोडो रुपयांची प्रॉपर्टी वाढली. या आधीदेखील केंद्रात, राज्यात आमची सत्ता होती. आम्ही कधी मस्ती केली नाही, आज सत्तेचा माज सुरू आहे. आता रस्त्याच्या अलीकडे पलीकडे वाटून घेतले आणि करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version