Ajit Pawar: या ठिकाणी होत्या आज अजित पवार यांच्या सभा

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून पुढील तपास सुरू आहे.
Ajit Pawar: या ठिकाणी होत्या आज अजित पवार यांच्या सभा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी सुमारे 7 वाजता सुरक्षा पथक आणि सहकाऱ्यांसह 8 आसनी चार्टर्ड विमानाने मुंबईहून रवाना झाले होते. हे विमान बारामतीकडे जात होते. बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम नियोजित होता.

आजच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तालुक्यातील चार ठिकाणी प्रमुख जाहीर सभांची रूपरेषा आखण्यात आली होती. त्यामध्ये

निरावागज – सकाळी 10:00 वाजता,

पणदरे – दुपारी 12:00 वाजता,

करंजेपूल – दुपारी 3:00 वाजता,

सुपा – सायंकाळी 5:30 वाजता
या सभांचा समावेश होता.

मात्र, या कार्यक्रमांना सुरुवात होण्याच्या काही वेळ आधीच एक अनपेक्षित घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version