Ajit Pawar AI Video : ‘आता रडत बसू नका…’, अजित पवारांचा भावनिक Video Viral

त्यांनी यामध्ये नेमका काय संवाद साधला? हे जाणून घेऊया. 
Ajit Pawar AI Video : ‘आता रडत बसू नका…’, अजित पवारांचा भावनिक  Video Viral

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.  पण दादा आजही आपल्यात आहेत अशी अनेकांची भावना आहे. त्यांच्या आठवणीत एक AI व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी यामध्ये नेमका काय संवाद साधला? हे जाणून घेऊया. 

‘अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला अजित पवार म्हणातात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं. लोकांनी मला ‘कामाचा माणूस’ म्हटलं तिच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहिल. पण नियती बघा कशी असते? आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणी ही माझ्या डोळ्यासमोर तुमचाच चेहरा होता.’

तसंच, ‘माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचे मन दुखावले असेल. तर माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय. पण महाराष्ट्र थांबता काम नये. माझी ही जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा पण विकासाची गती थांबून देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पूसून सांगतो की आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायायचा आहे. तुमचाच कामचा माणूस अजितदादा पवार.’ 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version