अजय गुजरला औरंगाबादमध्ये अटक

अजय गुजरला औरंगाबादमध्ये अटक

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अयज कुमार यांना औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संपाची नोटीस देणारे नेते म्हणून अकोला पोलिसांकडून अजय गुजर यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या पाचहून अधिक महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या संपावर न्यायालयाने निर्णय दिला असून २२ एप्रिलपर्यंत संपकारी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशह न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अद्याप कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी हल्ला केला.

याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आला असून आता एसटी कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष अजय कुमार यांच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई केली आहे. अकोला पोलिसांनी अजय कुमार यांना औरंगाबादमधून अटक केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अजय  गुजर यांनीच कर्मचाऱ्यांना संपाची नोटीस दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सदावर्तेंना ४ दिवसांची पोलीस कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, आता सातारा जिल्हा पोलिसांनी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version