Shamir Patel Disqualified : ठाकरे गटाच्या नगरसेवकानंतर आता एमआयएमच्या नगरसेवकाचेही पद रद्द; पोटनिवडणुकीची शक्यता

Shamir Patel Disqualified : ठाकरे गटाच्या नगरसेवकानंतर आता एमआयएमच्या नगरसेवकाचेही पद रद्द; पोटनिवडणुकीची शक्यता

​मुंबई : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 137 (एम-पूर्व विभाग) मधून इतर मागास (ओबीसी) राखीव प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. शमीर रमजान हे एमआयएम पक्षाचे नगरसेवक आहेत. अहमदनगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या महासभेतही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. ​​जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 मे 2026 रोजी शमीर पटेल यांचे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. मुंबई महापालिका अधिनियम, 1888 मधील कलम 16 (1सी)(अ) च्या तरतुदीनुसार, राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्याचे पद त्याच तारखेपासून रिक्त होते. त्यानुसार पटेल यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड 27 मे 2026 पासूनच कायदेशीररीत्या आपोआप रद्द झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : Devendra Fadnavis Govt. : राज्याचे आर्थिक नियोजन कोलमडले! फडणवीस सरकारकडून तब्बल 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचेही पद रद्द करण्यात आले होते. एकीकडे 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असतानाच उबाठा गटाला मुंबईत आणखी एक मोठा धक्का देण्यात आला होता. ठाकरे गटाचे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) वैध नसल्याचा निर्णय जात पडताळणी समितीने दिल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. दीपक सावंत यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेले जात प्रमाणपत्र कायदेशीर तपासणीत अवैध ठरले. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचे नगरसेवकपदही तातडीने रद्द करण्यात आले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version