Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीबाबत दत्ता भरणे यांचं मोठं विधान, "शेतकऱ्यांच्या खात्यावर…."

पुण्याच्या इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला दत्ता भरणे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीबाबत दत्ता भरणे यांचं मोठं विधान, "शेतकऱ्यांच्या खात्यावर…."

पुण्याच्या इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम 30 जुलै किंवा त्यापूर्वी जमा केली जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. योजनेच्या निकषांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे ही प्रक्रिया काहीशी लांबली असून, पुरवणी मागण्यांना मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट रक्कम जमा केली जाणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. 

यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मी बारा वर्षे स्वागतासाठी आलो नव्हतो पण आज आलेलो आहे पांडुरंगाला एकच साकडे घातले राज्यात सगळीकडे पाऊस पडू दे शेतकऱ्याच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळू दे त्याच्या चेहऱ्यावर आनंद येऊ दे असे मी पांडुरंगाला साकडे घातले आहे. आम्ही ढगाकडे डोळे लावून बसलो आहे धो धो पाऊस येऊ दे हेच साकडे आम्ही पांडुरंगाला घातले आहे. उभ्या महाराष्ट्राला सांगतो 30 जुलै पूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.”

हेही वाचा- Seed Testing: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बियाणे-खते तक्रारींच्या निवारणासाठी नवे नियम लागू

“आनंद आहे पालखी आज आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं स्वागत करणं काम आहे. इंदापूर मधील सर्वच मुक्कामाच्या ठिकाणी मी उपस्थित होतो.आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत आणि त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन आणि आम्ही काळजी घेत आहोत.”

“मी प्रत्येक पालखी सोहळ्यात फुगडी खेळत असतो. इंदापूर तालुक्यात पाच मुक्काम असतात पण यंदा चार मुक्काम आहेत.जे वारकरी या पालखी सोहळ्यात उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे. फुगडी खेळून आनंद द्यायचा असतो आनंद घ्यायचा असतो जेवढा आनंद दुसऱ्याला देतो त्यापेक्षा जास्त आनंद आपल्याला मिळत असतो. आषाढी एकादशीला मी जाण्याचे नियोजन केलेले मात्र त्याठिकाणी मुख्यमंत्री सर्व अनेक जण असतात मुख्यमंत्री असल्यावर आम्ही असावं असं नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version