Maharashtra Political Update : दादांच्या अकाली एक्झिटनंतर ‘वर्षा’ बंगल्यावर मोठ्या हालचाली, राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला; उपमुख्यमंत्रीपदावर दावा?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Maharashtra Political Update : दादांच्या अकाली एक्झिटनंतर ‘वर्षा’ बंगल्यावर मोठ्या हालचाली, राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला; उपमुख्यमंत्रीपदावर दावा?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान, आमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली. आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. प्रफुल पटेल म्हणाले की, राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा अजित पवार यांच्याकडे होती. आज न् उद्या आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांना फक्त एवढेचं सांगितलं की, येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या पक्षातील सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करू. अजित पवारांचं पक्षासाठी जे योगदान होतं, जी भूमिका होती, त्यानुसार योग्य निर्णय घेऊ. सुनेत्रा पवार यांच्याशी अजून चर्चा केलेली नाही. हा आमचा अंतर्गत विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच्या जनभावनेचा योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे. त्या दिशेने आम्ही विचार करू. आज राजकीय दुखवट्याचा तिसरा दिवस आहे. या संदर्भात सुनेत्रा पवार वाहिनींशी आम्हाला बोलावं लागेल. शक्य असेल तर रात्री किंवा उद्या आम्ही सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी बोलू. ही जागा आम्हाला भरायची आहे, जी भावना आहे. त्यातून योग्य निर्णय होईल, असे पटेल म्हणाले.

हेही वाचा : Pune News: पवारांच्या राष्ट्रवादीवर एकाच आठवड्यात दोन मोठे आघात; अजितदादांनंतर आता पुण्यातील ‘हा’ मोहरा हरपला

अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे पक्षांची धुरा कोण सांभाळणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार, या सर्व विषयांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, एकीकडे दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या हालचालींना काही नेते दुजोरा देत असतानाच राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे उपमुख्यंत्रीपदाचा पेच लवकरात लवकर सुटेल, असे चित्र दिसून येत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version