Narhari Zirwal : "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, आमची सर्वांची मागणी" नरहळी झिरवळांचं वक्तव्य

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री नरहळी झिरवळ यांनी देखील सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे. 
Narhari Zirwal : "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, आमची सर्वांची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर संपुर्ण राज्यावर दुःखवटा ओढावला आहे. अजित पवार यांचे काल 29 जानेवारीला अंत्यविधी पार पडले. त्यानंतर आता अजित पवार यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला होता. यावर राष्ट्रवादी आणि अनेक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान अनेकांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री नरहळी झिरवळ यांनी देखील सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे. 

हेही वाचा- Pune News: पवारांच्या राष्ट्रवादीवर एकाच आठवड्यात दोन मोठे आघात; अजितदादांनंतर आता पुण्यातील ‘हा’ मोहरा हरपला
नरहळी झिरवळ म्हणाले की, “कालचा अजित पवारांचा अंत्यविधी झाल्यानंतर सगळ्यांना असा प्रश्न पडला आहे की, आता काय? आता पुढे दादांची जागा कोण घेणार? यावेळी दादांची जागा घेण्यासाठी हे असले तर असं होईल ते असले तर तसं होईल… असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर बारामतीमधले आणि इतर सगळ्यांनी मागणी केली की आता आम्हाला सुनेत्रा वहिनींशिवाय पर्याय नाही… पक्ष उभारणीसाठी दादांचा चेहरा त्यांच्या बाजूला ठेवून दादांची सर येईल नाही येईल हा नंतरचा प्रश्न आहे… पण वहिनींच्या मदतीने एक उभारी येईल अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात आहे. पक्षाची मागणी नंतर पण जनतेची मागणी आहे की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा… आम्हाला सुद्धा तेच वाटत की, दादांची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं तर बरं होईल.” असं म्हणतं नरहळी झिरवळ यांनी मनातील इच्छा व्यक्त केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version