Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच आपला दिल्ली दौरा केला आहे. या दरम्यान, अनेक राजकीय खलबती झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच त्यांनी दिल्ली दौऱ्यानंतर यांचा पहिला फोन शिवसेना (उबाठा) चे प्रमुख उद्धव ठाकरेंना केला असल्याचे समजते. हा फोन त्यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा द्यावा, अशी मागणी केल्याच्या निमित्ताने केला असल्याचे सांगितले जात आहे. या मागणीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजते. अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच सर्वच पक्षांना आवाहन केले होते. मात्र तरीही महाराष्ट्र काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार देणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. परंतू उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. सोमवार, 6 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी स्वतः मातोश्रीवर फोन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

 हेही वाचा :  Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version