आदित्य ठाकरेंची चाढ्यावर मूठ, बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद

आदित्य ठाकरेंची चाढ्यावर मूठ, बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद

लातूर येथे विद्यर्थ्यांशी संवाद साधून नांदेडकडे जात असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचा ताफा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहचला. एवढंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांबरोबर पेरणी करीत सध्या पेरणीच्या स्थितीची माहिती घेऊन शेती व्यवसायात येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.

लातूरहून नांदेडकडे मार्गस्थ होत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकूरसह उदगीर तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील संवाद साधला.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे पिकांची मशागत करीत असलेल्या शेतकऱ्याबरोबर पिकांची मशागत करत आदित्य ठाकरे यांनी शेतीतल्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाने हुलकावणी दिल्याने काय अडचणी निर्माण झाल्या, पिकांची स्थिती काय आहे, पाण्याचं नियोजन काय आहे या विषयावर चर्चा केली.

आदित्य ठाकरे यांना शिवारात पाहताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली.

या सर्व शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यामुळे युवासंवाद या कार्यक्रमाचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी सर्व घटकांशी संवाद साधून एक वेगळी छबी निर्माण केली आहे. उशिरा का होईना मराठवाड्यात पावसाची कृपादृष्टी होईल असा आशावाद व्यक्त करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version