‘नव्या नोटा धोरणानुसार’

‘नव्या नोटा धोरणानुसार’

दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्याच्या निर्णयावर आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २००० रुपयांच्या नोटा आणण्याचा उद्देश पूर्ण झाला असं आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

२३ मे पासून देशातील सर्व बँकांमध्ये २,००० रुपयाच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार असून मागील आठवड्यात २,००० रुपयांच्या नोटा मागे घेण्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे वक्तव्य समोर आले आहे. बाजारात इतर नोटांची कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले असून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची अनेक कारणे होती. लोकांनी घाबरू नये.असे आवाहन शक्तिदास दास यांनी केले.

“भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी,” असे आरबीआयने म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version