‘प्रशासनाकडून सत्तेचा दुरुपयोग’ – नारायण राणे

‘प्रशासनाकडून सत्तेचा दुरुपयोग’ – नारायण राणे

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेची कारवाई होण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. प्रशासनाकडून सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आमदार नितेश राणे चांगले काम करतात म्हणून सर्वांना पोटदुखी होते, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीचे राजकारण तापले आहे. तर संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेते करत आहेत. नारायण राणे यांनी नागपूर दौरा रद्द करत कणकवलीत दाखल झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत मविआवर टीका केली आहे. प्रशासनाकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणाशी नितेश राणे यांचा काहीही संबंध नसल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी आज नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार  आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version