औरंगजेबाच्या समर्थनावर अबू आझमी विरोधात ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल ?

औरंगजेबाच्या समर्थनावर अबू आझमी विरोधात ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल ?

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंग्याच्या समर्थनार्थ वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक नेत्यांनी आझमीवर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. ठाण्यात खासदारांसह शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

औरंगजेबाच्या बाजूने अबू आझमींचे वक्तव्य
अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यात "औरंगजेबाच्या काळात भारत सोन्याची चिमणी होता. तो एक चांगला प्रशासक होता. त्याच्या काळात उत्तम शासन होते," असे म्हटले. त्यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निषेधार्थ भूमिका घेतली आहे.

शिवसेना (शिंदे गट) आक्रमक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमी यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत "देशभक्तांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे," असे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी "शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना थारा नाही," असे म्हणत आझमींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा; बीड बंदची हाक

आदित्य ठाकरे यांचा संताप
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनीही आझमींवर हल्लाबोल केला. "राहुल सोलापूरकर, कोरटकर आणि आता अबू आझमी – हे वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे," अशी त्यांची मागणी आहे.

ठाण्यात अबू आझमी विरोधात गुन्हा दाखल
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी "अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे," अशी जोरदार मागणी केली. त्यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अबू आझमी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिवसैनिकांचा संताप
अबू आझमी यांच्या विधानावर संतप्त झालेले शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. "आझमींना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही," असे म्हणत शिवसैनिकांनी ठाण्यातील पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

पुढील कारवाई काय?
अबू आझमी यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. ठाणे पोलिसांनी तक्रारीची चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version