Abhijeet Dipke: ‘…अन्यथा आई-वडिलांना मारुन टाकू’,अभिजीत दीपके यांना धमकी आल्याचा कुटुंबीयांचा दावा

तसे न केल्यास आई-वडिलांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांच्या आई अनिता दीपके यांनी केला.
Abhijeet Dipke: ‘…अन्यथा आई-वडिलांना मारुन टाकू’,अभिजीत दीपके यांना धमकी आल्याचा कुटुंबीयांचा दावा

नीट आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणारे CJP (कॉक्रोच जनता पार्टी) चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे आई-वडील यांनी धक्कादायक दावा केला आहे. अभिजीतला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धमकीचा व्हिडिओ पाठवण्यात आला होता. तसेच तसे न केल्यास आई-वडिलांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांच्या आई अनिता दीपके यांनी केला.

Deep Sea Fishing Maharashtra: 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; मात्र किनारपट्टीवरील बंदी कायम, नितेश राणेंची माहिती 

अनिता दीपके यांनी सांगितले की, सुरुवातीला अभिजीतने ही बाब कुटुंबापासून लपवून ठेवली होती. नंतर त्याने संपूर्ण प्रकार सांगत काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या आणि त्यांचे पती भगवान दीपके यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव सुमारे 16 दिवस नातेवाईकांकडे वास्तव्य केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version