पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे काही दिवसापूर्वी राधा पाटील हिच्या कार्यक्रमात राडा झाल्यानंतर आज पुन्हा सुस्ते गावात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. खासदार धनंजय महाडिक समर्थक आणि विरोधकात हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हाणामारीत डोळ्यात मारायचा स्प्रे फायटर व इजा पोहोचवणाऱ्या हत्यारांचा वापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
ज्यामुळे या वादाचे रूपांतर शेवटी अत्यंत रक्तरंजित हाणामारीत झालं. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या भीषण हाणामारीमुळे सुस्ते गावात आणि संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.
या हाणामारी मागील प्रमुख कारण, समाज माध्यमातून खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आणि राजकीय नेत्यांवर झालेली टीका टिप्पणी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान हाणामारीचं मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.