Viral Video : दबंग खानच्या भावाची ‘दबंगगिरी’! विनाहेल्मेट ड्रायव्हिंग; शूट करणाऱ्याला शिवीगाळ

सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चर्चेत आले आहेत. अशातच सोहेल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Video : दबंग खानच्या भावाची ‘दबंगगिरी’! विनाहेल्मेट ड्रायव्हिंग; शूट करणाऱ्याला शिवीगाळ

बॉलिवूडचा भाईजान असलेला सलमान खान आणि त्याचे दोन भावंड हे कोणत्या न कोणत्या गोष्टीतून सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असतात. सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चर्चेत आले आहेत. अशातच सोहेल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोहेल खान विनाहेल्मेट बाईक चालवत असताना एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ शूट करत होता. त्यावेळेस त्याची नजर त्या व्यक्तीवर पडल्याबरोबर त्याने रागाच्या भरात त्या अज्ञात व्यक्तीला भररस्त्यात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सोहेल खानचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्या वागणुकीवर तीव्र टीका केली. यानंतर सोहेल खानने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या वागणुकीची दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. 

हेही वाचा- Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे अडकला लग्नबंधनात, कोण आहे जीवनसाथी? फोटो समोर
त्यानंतर सोहेल खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, “मी सर्व दुचाकीस्वारांना विनंती करू इच्छितो की कृपया हेल्मेट घाला. मला कधीकधी क्लॉस्ट्रोफोबिया जाणवतो म्हणून मी हेल्मेट घालणे टाळतो पण ते न घालण्याचे कारण नाही. लहानपणापासूनच सायकल चालवणे हा माझा छंद आहे. त्याची सुरुवात BMX सायकलने झाली आणि आता मी सायकल चालवतो. मी बहुतेक रात्री उशिरा सायकल चालवतो जेव्हा जास्त रहदारी नसते तेव्हा धोका कमी करण्यासाठी आणि तोही मंद गतीने आणि माझी गाडी माझ्या मागे येत असते. मी इतर रायडर्सना आश्वासन देतो की मी माझ्या क्लॉस्ट्रोफोबियावर मात करण्यासाठी आणि हेल्मेट घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, म्हणून कृपया माझ्यासोबत राहा. वाहतूक अधिकाऱ्यांची मी मनापासून माफी मागतो आणि त्यांना आश्वासन देतो की मी यापुढे सर्व नियमांचे पालन करेन. आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या अस्वस्थते असूनही नेहमीच हेल्मेट घालल्याबद्दल मी सर्व रायडर्सना सलाम करतो. माफी मागण्यापेक्षा सुरक्षित राहणे चांगले. पुन्हा एकदा मला खरोखर माफी मागतो. सध्या सोहेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version