BMC Election 2025 : मुंबईत ‘मविआ’चं नवं समीकरण! शरद पवार गट अखेर ठाकरे बंधूंसोबत; किती जागा मिळणार?

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आगामी निवडणुकीसाठी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या 'ठाकरे बंधू' युतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
BMC Election 2025 : मुंबईत ‘मविआ’चं नवं समीकरण! शरद पवार गट अखेर ठाकरे बंधूंसोबत; किती जागा मिळणार?

BMC Election 2025 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीमधील जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आगामी निवडणुकीसाठी शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या 'ठाकरे बंधू' युतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

25 जागांचा प्रस्ताव, 10-12 जागांवर तडजोड?

राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुरुवातीला काँग्रेससोबत जाण्याची चाचपणी केली होती, परंतु अखेर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तब्बल दोन तास चर्चा केली होती. यावेळी राष्ट्रवादीने 25 जागांची मागणी केली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, युतीमध्ये राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळण्याची दाट शक्यता असून, त्यावरच शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – Gautam Adani And Sharad Pawar : 'शरद पवार माझे मार्गदर्शक…'; गौतम अदानींच्या वक्तव्यानं खळबळ

ठाकरे बंधू आणि पवारांची साथ

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित लढण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. आता या 'ठाकरे युती'ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाल्याने या त्रिकुटाची ताकद वाढली आहे. ही आघाडी मुंबईतील मराठी आणि इतर हक्काच्या मतपेढ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.

हेही वाचा – Solapur Politics: MIM ला सोलापुरात मोठे खिंडार ! 'या' बड्या नेत्याचा राजीनामा

दरम्यान, एकीकडे ही मोठी युती आकाराला आली असताना, दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याचे समजते. हे दोन्ही पक्ष मुंबईत स्वबळावर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version