PMC Election 2026: ऐन निवडणुकीत अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का! मोठ्या नेत्याची निवडणुकीतून एक्झिट

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
PMC Election 2026: ऐन निवडणुकीत अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का! मोठ्या नेत्याची  निवडणुकीतून एक्झिट

PMC Election 2026: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दलित मतदारांची मोट बांधण्यासाठी अजित पवारांनी ज्यांच्याशी युती केली होती, त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरात यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची तारीख जवळ आली असतानाच खरात यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – Ambernath Municipal Council: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठ खिंडार; 12 नगरसेवकांचा सामूहिक भाजप प्रवेश

युती तुटली; खरातांचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दलित मतांचे गणित जुळवण्यासाठी खरात गटाला सोबत घेतले होते. मात्र, जागावाटपावरून निर्माण झालेली नाराजी अखेर स्फोटक ठरली. सचिन खरात यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्हाला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मी या निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडत आहे. कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला माझा पाठिंबा असणार नाही. खरात यांच्या या भूमिकेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक मतदारसंघांत राष्ट्रवादीची हक्काची मते विखुरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा –Sanjay Raut And Eknath Shinde Meeting: मुंबईत एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा, नेमकं काय घडलं?

अजित पवारांसमोर नवे आव्हान

मुंबई, ठाणे आणि नाशिकप्रमाणेच पुणे-पिंपरीची सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी सचिन खरात हे त्यांचे महत्त्वाचे 'कार्ड' होते. मात्र, प्रचाराचा जोर वाढत असतानाच मित्रपक्षाने दिलेला हा झटका अजित पवारांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. आता ही गळती रोखण्यासाठी आणि नाराज मतदारांना पुन्हा वळवण्यासाठी अजित पवार काय पाऊल उचलतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version