रंग निर्मिती कारखान्याला भीषण आग

रंग निर्मिती कारखान्याला भीषण आग

पुण्यातील धायरी भागात असलेल्या गणेश नगर गल्ली क्रमांक २२ येथे एका पेंटच्या कारखान्याला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. संध्याकाठी ७ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान या अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीएमआरडीए व पुणे अग्निशमन दलाकडून ०८ वाहने दाखल झाली आहेत. या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

संबंधित आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पुणे पोलीस दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील गर्दी दूर सारण्याचे काम करण्यात आले. कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरु करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

या आगीत मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असून अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या आठ ते दहा अग्निशामक दल बंबांनी आग शमविण्यासाठीचे काम सुरू केले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कारखान्याच्या परिसरात लाकडाचे व तत्सम कारखाने किंवा शेड होत्या त्यांनाही आगीचा फटका बसला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version