नोराच्या तालावर नाचला विदेशी गायक

नोराच्या तालावर नाचला विदेशी गायक

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : आपल्या मनमोहक अदांनी अभिनेत्री नोरा फतेहीने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. नोरा समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. नोरा चे अफलातून फोटो आणि डान्स व्हिडिओज पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच आतुर असतात.दरम्यान नोराचा एक व्हिडिओ सध्या सामाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.


अलीकडेच नोरा एका कॉन्सर्ट मध्ये गेली होती. यावेळी तिचा डान्स करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ‘बेबी काम डाउन’ फेम गायक रेमा याच्या सोबत तिने भन्नाट डान्स केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सिंगर रेमा आणि नोरा फतेही हे दोघे ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओ खाली नेटकाऱ्यानी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version