नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात खडाजंगी

नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यात खडाजंगी

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना पुन्हा लव्ह जिहाद मुद्द्यावरून भाजपा आमदार नितेश राणे आणि आमदार अबू आझमी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानभवनाच्या बाहेर हे दोन्ही नेते आमने-सामने आले. यावेळी त्यांच्यामध्ये लव्ह जिहादवरून शाब्दिक चकमक झाली.

आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मदरसांच्या बांधकामावरून सुरु झालेली चर्चा लव्ह जिहादवर जाऊन पोहचली. नितेश राणे अबू आझमी यांना म्हणाले, तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान असल्याचे ते म्हणाले. तसेच तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असंही नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनीही प्रतिक्रिया दिली. आझमी म्हणाले, मी तुम्हाला खोटं आहे सांगायला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तर, तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे अबू आझमी यांना म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, ‘कोणी कोणाशी लग्न करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु लग्नाच्या आधी तू आशिष असतो, पण लग्नानंतर अमिन होतो हीच तर समस्या आहे. तू त्या मुलीला लग्नानंतरही हिंदू ठेवा. तिने कुराण वाचावं, हिंदू देवतांचे फोटो काढावेत ही जबरदस्ती का? यावर आमचा आक्षेप आहे’, असे ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version