ताई गटाच्या शहर अध्यक्षांवर राबोडीत गुन्हा दाखल

ताई गटाच्या शहर अध्यक्षांवर राबोडीत गुन्हा दाखल

मुंबई, १३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राबोडी येथे महापालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करत असताना सुहास देसाई त्या ठिकाणी आले. त्यांनी कारवाई रोखली तसेच कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली असे महापालिकेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तकरीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version