जळगावमध्ये इमारत कोसळली

जळगावमध्ये इमारत कोसळली

जळगाव, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जळगावमध्ये शिवाजीनगर भागातील अमर चौक येथे ७४ वर्ष जुनी इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात राजश्री सुरेश पाठक नावाची ७० वर्षांची महिला अडकली होती. या महिलेचा मृत्यू झाला. मदतकार्य करत असलेल्या पथकाने राजश्री यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेली इमारत जीर्ण झाली होती. यामुळेच ही इमारत कोसळली. जळगाव महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वात मदतकार्य सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version