वृद्धाश्रमात ८६ वर्षीय आजोबाला मारहाण

वृद्धाश्रमात ८६ वर्षीय आजोबाला मारहाण

केअर सेंटर या वृद्धाश्रमात एका 86 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आलीय. वृद्धाश्रमात काम करणाऱ्या केअर टेकरनं ही मारहाण केलंय. मारहाणीची घटना एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलीय. धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली साई केअर सेंटर या वृद्धाश्रमात घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही समाजसेवकांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केयर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करताना दिसतं आहे. हे कृत्य पाहून निर्दयीपणाचा कळसच आहे असंच म्हणायला हवं. ज्येष्ठ नागरिकांना केअर सेंटरमध्ये त्यांचा देखभालसाठी ठेवण्यात येतं. त्यांचा सोबत अशी वागणून पाहून नेटकरी संतापले आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लहान मुलं आणि वृद्ध लोक वयाने सारखीच असतात. वृद्ध नागरिक एका लहान मुलासारखे हट्ट करत असतात. अनेक वेळा ते आपलं बोलणं ऐकत नाहीत. एखाद्या गोष्टीसाठी अडून बसतात. अशावेळी त्यांना हाताळणे कठीण होतं. म्हणून त्यांना अशाप्रकारे मारहाण करणे ही चुकीची आणि अयोग्य गोष्ट आहे. वृद्ध नागरिकांना सांभाळं हे कठीण काम असलं तरी त्यांना प्रेमाने हाताळावे लागते. चिडचिड आणि त्रागा करुन काम होतं नाहीत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version