‘नाले साफाई करा अन्यथा कोंडून ठेवेल’

‘नाले साफाई करा अन्यथा कोंडून ठेवेल’

राज्यमंत्री बच्चू कडू हे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी, त्यांनी चक्क मलकापूरच्या मुख्याधिकारी यांना फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मलकापूरमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाले साफसफाईच्या कामाकडे नगर पालिका दुर्लक्ष करत असल्याने सदर नाल्या ४ दिवसात साफ करा. अन्यथा कोंडून ठेवेल अशी धमकी बच्चू कडू यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिली आहे.

राज्याच्या मंत्र्याला कामासाठी अधिकाऱ्यांना वारंवार धमक्या द्याव्या लागत आहेत. याआधी सुद्धा बुलडाण्याच्या दौऱ्यावर असतांना एका अधिकाऱ्याला त्यांनी फोन वरून धमकी दिली होती, त्यांनतर आता पुन्हा मलकापूरच्या मुख्याधिकाऱ्याला नाले साफसफाई वरून कोंडून ठेवण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा फोन कॉल आता सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. या धमकी फोन वरून आता मलाकापुरमधील मुख्यअधिकाऱ्याला फोन आल्या नंतर नालेसफाई होणार का हे देखील पाहणे महत्वाचे आहे. बच्चु कडूंनी दिलेल्या धमकी आता पुढे काय होणार हे पहावे लागेल.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काय दिली धमकी ऐकुया

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version