गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी ६ संशयित ताब्यात

गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी ६ संशयित ताब्यात

गेल्या १५ दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडकोमध्ये अज्ञातांकडून चारचाकी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग दोन दिवस नाशिकमध्ये गाड्यांची तोड फोड करण्यात आल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, तसेच काही नागरिकांनी संताप व्यक्त करत लवकरात लवकर गुन्हेगारांचा छडा लावण्याची पोलिसांना विनंती केली होती.

याबाबत नाशिक रोड पोलिसांनी माहिती दिल्यानुसार एकूण ६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांनी मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

गाड्यांची तोडफोड करणाऱ्या संशयितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितले, परिसरात अश्या घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version