लांडग्यांनी केला मेंढ्यांवर हल्ला, 45 मेंढ्या मृत्यमुखी

लांडग्यांनी केला मेंढ्यांवर हल्ला, 45 मेंढ्या मृत्यमुखी

शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. यात 45 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने, मेंढपाळ सतीश शेळके यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील हितवड येथे घडली आहे.

नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील काणेरीवाडीत शेतात चरायला सोडलेल्या मेढ्यांवर मध्यरात्री लांडग्याने हल्ला केला आहे. यामध्ये 45 मेढयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढपाळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मेंढपाळ सतीश शेळके  कोल्हापूर मधील रहिवासी आहे. त्याचा मेंढीपालनचा व्यवसाय असल्याने त्याने त्याच्या मेंढ्या शेतात ठेवल्या होत्या. मात्र मध्यरात्री 8 ते 10 लांडग्यांनी मेंढ्यांवर हल्ला केला असून यात 45 मेंढ्या मृत्यमुखी पडल्या आहेत.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version