निवडणूक आयोगाची मोदी, राहुल प्रकरणी पक्षाध्यक्षांना नोटीस

निवडणूक आयोगाची मोदी, राहुल प्रकरणी पक्षाध्यक्षांना नोटीस

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी भाजपाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांच्या भाषणांवरून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या सेक्शन ७७ अंतर्गत निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे.

काँग्रेस तुमची संपत्ती जास्त मुले असणाऱ्यांना वाटणार अशा स्वरुपाचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या वक्तव्यावरून नड्डा यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर गरीबीच्या मुद्यावर राहुल यांनी केलेल्या वक्तव्यावरून खर्गे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version