मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांची आत्महत्या

मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सोयगाव नगरपंचायतीमधून निलंबित झालेल्या कर्मचाऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाला. पैशांअभावी मुलीवर उपचार करणे शक्य झाले नाही, असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे होते. मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासांतच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. नातलगांनी आत्महत्या करणाऱ्याचा मृतदेह नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवला आणि निलंबनाची कारवाई करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version