मुंबई , ८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिउबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी होणार आहे. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तीकरांची पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे.अमोल कीर्तिकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांना ईडीची नोटीस आली होती. आज त्यांची ईडी चौकशी होणार आहे
कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तीकर यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कथित खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. यामध्ये यापूर्वी कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.