अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नवव्यांदा समन्स

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नवव्यांदा समन्स

नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवव्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना गुरुवारी, २१ मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

न्यायालयाने ईडीला या तक्रारींशी संबंधित कागदपत्रे केजरीवाल यांच्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय तपास संस्थेने जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीच्या तक्रारींवरून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना बजावलेल्या समन्सला गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version