यासिन मलिकसह अनेक दहशतवादी संघटनांवर बंदी

यासिन मलिकसह अनेक दहशतवादी संघटनांवर बंदी

नवी दिल्ली, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने शनिवारी यासिन मलिकच्या जेकेएलएफ या दहशतवादी संघटनेवरील बंदी पुढील पाच वर्षांसाठी वाढवली. सरकारने याला ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित केले आहे.

केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या यासिन मलिक याच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट, जम्मू आणि काश्मीर पीपल्स फ्रीडम लीग आणि जम्मू आणि काश्मीर पीपल्स लीग (जेकेपीएल) या चार गटांवर बंदी घालण्यात आली आहे. जेकेएलएफ संघटना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या कारवायांमध्ये गुंतलेली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. जर कोणी देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देताना आढळले तर त्याला कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही शाह म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version