मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातून भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी ३० जागा भाजपा तर १० जागा शिवसेना आणि ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याची घोषणा लवकरच होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी सल्लामसलत करून उमेदवारांबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत.
महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं
भाजपा ३० जागा लढवणार
शिवसेना १० जागा लढवणार
राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागा लढवणार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.