ममता बॅनर्जींना दणका

ममता बॅनर्जींना दणका

कोलकाता, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने ईडी अधिकाऱ्यांवर पाच जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यासह संदेशखालीशी संबंधित तीन प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. तसेच संदेशखालीतील जबरदस्तीने केलेले भूसंपादन आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांचा मुख्य आरोपी शाहजहां याला मंगळवार ५ मार्च रोजीच सीबीआयच्या ताब्यात द्यावे, असेही निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले. याआधी २९ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहां याला अटक केले. स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांनी शाहजहां याला पोलीस कोठडी दिली. आता कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांना संदेशखालीशी संबंधित तीन प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. तसेच शाहजहां याला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version