मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २६ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाले. या अधिवेशनात पहिल्या दिवशी सन २०२३ – २४ साठीच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील आणि मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी चार महिन्यांचे लेखानुदान सादर केले जाईल. यानंतर जुलै महिन्यात उर्वरित आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला जाईल.
विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींना विधानसभेत आणि विधानपरिषदेत सर्वपक्षीय आमदारांनी विशेष अधिवेशनात पाठिंबा दिला. विशेष अधिवेशन मंगळवार २० फेब्रुवारी २०२४ रोजी झाले. यानंतर सोमवार २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मराठ्यांना फसवू नका, आरक्षण द्या अशी मागणी विरोधकांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.