नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी पुढल्या आठवड्यात जाहीर करणार आणि या यादीत शंभर उमेदवारांची नावं असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीनंतर यादी प्रसिद्ध होणार असल्याची चर्चा आहे.
भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ३७० जागा जिंकू आणि रालोआला ४०० पेक्षा जास्त जागा मिळवून देऊन असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीत कोणकोणत्या उमेदवारांचा समावेश असेल या चर्चेने जोर धरला आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश असेल, अशीही चर्चा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.