पवारांनी ४० वर्षांनी रायगड गाठला

पवारांनी ४० वर्षांनी रायगड गाठला

पुणे, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘अजित पवारांमुळे शरद पवारांना रायगडावर जावे लागले. राजकारणात ४० वर्षांची कारकिर्द झाल्यानंतर पवारांना छत्रपतींच्या चरणी जावे लागले’; असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पवारांच्या रायगडावर जाण्यामागे अप्रत्यक्ष का होईना पण अजित पवारांचे श्रेय असल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे पोलिसांनी दिल्लीतून आणि राज्यातून ड्रग्जचा कोट्यवधी रुपयांचा साठा पकडला. या प्रकरणी पोलिसांचे कौतुक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पवारांच्या रायगडावरील कार्यक्रमावर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीसाठीच्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय जाहीर करू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version