पवारांना बारामतीत अडकवणार ?

पवारांना बारामतीत अडकवणार ?

बारामती, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमित्रा अजित पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जर ही शक्यता प्रत्यक्षात आली तर बारामतीत नणंद – भावजय यांच्यातील राजकीय चुरस दिसेल. अजित पवार यांनी पत्नीसाठी ताकद पणाला लावली तर बारामतीत मुलीची खासदारकी वाचवण्यासाठी शरद पवारांना मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा लागेल. यामुळे ते स्वतः बारामतीत अडकून पडण्याची शक्यता आहे. पवार बारामतीत अडकले तर त्याचा प्रतिकूल परिणाम राशपच्या तसेच मोदी विरोधकांच्या इतर लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रचारावर होईल. मोदीविरोधी आघाडीचा समन्वय कमकुवत होण्याचाही धोका आहे. शरद पवार हे फक्त तीन तालुक्यांचे नेते अर्थात स्थानिक नेते झाल्याची ओळख ठळक होईल.

बारामती कुणाचं ऐकणार ?
सुप्रिया सुळे यांच्या पुढील आव्हान
कोण आहेत सुनेत्रा पवार ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version