मोदी विरोधी गटाला नवा धक्का

मोदी विरोधी गटाला नवा धक्का

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मोदी विरोधी गटाला नवा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये तर समाजवादीने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी जागा सोडण्यास नकार दिला आहे. या दोन पक्षांच्या पाठोपाठ आता आम आदमी पार्टीने पंजाब आणि दिल्लीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवू आणि काँग्रेससाठी एकही जागा सोडणार नाही, अशी घोषणा केली आहे. बिहारमध्ये मोदी विरोधी आघाडी नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा विचार करत होती. पण नितीश यांनी महागठबंधनमधून बाहेर पडून भाजपासोबत युती करून सरकार स्थापन केले. यामुळे लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच मोदी विरोधी गटाला खिंडार पडले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version