मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी कुणाची याची सुनावणी जानेवारी २०२४ मध्ये होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात १० जानेवारी २०२४ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे विधिमंडळाचा सगळा कारभार नागपूरमधून सुरू होता. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची अंतिम टप्प्यातील सुनावणी नागपूर येथे पार पडली. यानंतर कामकाजाच्या व्यापामुळे सर्व कागदपत्रे वाचून निर्णय देण्यासाठी वेळ लागेल. अधिवेशन संपल्यावर कागदपत्रे नागपूर येथून मुंबईत नेली जातात. या प्रक्रियेला लागणारा वेळ पण विचारात घेणे आवश्यक असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर न्यायालयाने १० जानेवारी २०२४ पर्यंत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी निर्णय द्यावा, असे सांगितले. आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.