अमरावती, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अमरावतीत राहत्या घरासमोर अंगणात असलेल्या एका कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत तीनजण जागीच ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रेता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.अनुसया अंभोरे (वय ६७), शामराव अंभोरे (वय ७०) आणि अनारकली गुजर (वय ४३) यांचा मृत्यू झाला. तर तीन गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर आरोपी कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे तर खल्लार पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.