‘धारावीसाठी नाही मातोश्री बचावसाठी मोर्चा’

‘धारावीसाठी नाही मातोश्री बचावसाठी मोर्चा’

मुंबई , १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ‘धारावी बचाव’ मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वत:उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी या मोर्चात ठाकरे गटाचे नेते, काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. अदानी उद्योग समूहाला देण्यात आलेल्या धारावी प्रकल्पात त्रुटी असल्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. ठाकरेंच्या या मोर्चावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

शनिवारी निघालेला ‘धारावी बचाव’ मोर्चा नव्हता तर ‘मातोश्री’ बचाव मोर्चा होता, तो धारावीच्या निमित्ताने निघाला, असा टोला नितेश राणेंनी ठाकरेंना लगावला. तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख सुषमा फर्निचरवाले करत त्यांनाही टोला लगावला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version