नागपूर, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आहे. हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत पार पडेल. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अर्थात बुधवारी ६ डिसेंबर रोजी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे, अशी टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी
हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार २० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.
हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण – नागपूर
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी – ७ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.