‘उद्धव यांनी आधी पक्ष सांभाळावा’

‘उद्धव यांनी आधी पक्ष सांभाळावा’

मुंबई, ६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव यांनी आधी पक्ष सांभाळावा, असे महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. याआधी मुंबईत उद्धव यांनी मंत्रालय परिसरातील पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी निवडणुकीसाठी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. यापैकी तीन राज्यात भाजपाला बहुमत मिळाले. तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली तर मिझोराममध्ये झेडपीएमची सत्ता आली. उद्धव मात्र सोयीस्करपणे फक्त जिथे भाजपाचा विजय झाला त्या राज्यांची चर्चा करून ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करतात. हा मुद्दा पत्रकारांपुढे मांडत राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव यांच्यावर टीका केली. स्वतःचा पक्ष सांभाळा असा सल्ला पण विखे पाटील यांनी उद्धव यांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version