किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी

किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शवपिशवी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी करण्यात आली. तब्बल सहा तास किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली. याआधी ईडीने किशोरी पेडणेकर यांना आठ नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण किशोरी पेडणेकर यांनी वेळ मागून घेतला. काही दिवसांच्या अंतराने ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावला. अखेर या समन्सला प्रतिसाद देत माजी महापौर किशोरी पेडणेकर गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात हजर झाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version