पुणे, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरीत आणि मोहाडी तालुक्यातल्या बीडमध्ये १७ नोव्हेंबर रोजी महिलांना नाचत असताना विवस्त्र करणे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर पैसे उधळण हा प्रकार घडला. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्हिडीओ प्रकरणी पोलीस चौकशीचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांना दिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातून महिलांचं लैंगिक शोषण करणं किंवा त्यासारखं गुन्हे करणं हे अत्यंत चीड आणणारं असल्याचं डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. व्हिडीओ प्रकरणात काही राजकारणी आहे, त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, असेही निर्देश नीलम गोऱ्हे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांना दिले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.