केजरीवाल, प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

केजरीवाल, प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. कोणताही ठोस पुरावा सादर करायचे टाळून पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. भाजपाने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली. नोटीसला उत्तर देण्यासाठी गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. देशातील दिग्गज नेते या निवडणुकांच्या मैदानात उतरले असून प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या वातावरणात अरविंद केजरीवाल आणि प्रियांका गांधी यांनी मोदींविषयी वक्तव्ये केली. याच प्रकरणात निवडणूक आयोगाने केजरीवाल आणि प्रियांका गांधी यांना नोटीस बजावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version